कळंब / प्रतिनिधी-

 सर्वांनी आपल्या भारताची बॉर्डर बघणे आवश्यक  आहे कारण सिमेवर सैनिक आपले रक्षण कशा पद्धतीने करतो त्यात त्याला काय काय अडचणी चा सामना करावा लागतो ते प्रत्यक्षरीत्या आपल्याला बघितल्यावर कळते असे मत सत्कार प्रसंगी पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांनी व्यक्त केले

वाईस ऑफ मीडिया कळंब तर्फे नूतन पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुढे ते असे म्हणाले कि मी जवळपास अठरा वर्षे आर्मी मध्ये होतो त्यानंतर मी पोलीस खात्यात आलो खंर तर सैनिकाचे जीवन हे काय साधी सोपे नसते आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात कारण मी वाचलो तर देशवाशी वाचतील म्हणून सैनिक स्वतंला वाचवत असतो. मी कित्येक वर्ष झालं पोलीस खात्यामध्ये ड्युटी करत आहे त्यात मी खूप वर्ष झाली घरच्याच तोंड सुद्धा पाहू शकलो नाही ही खंत मला वाटते आणि खरंच घरच्यांचं कुटुंबांच कौतुक करावं वाटतं की त्यांनी मला व माझ्या कर्तव्यावला समजुन घेतले. कळंब बद्दलच प्रेम माझं पहिल्यापासूनच आहे आणि यापुढेही राहणार आहे त्यानुसार मी प्रामाणिकपणे कायदा व सुव्यवस्था संरक्षण करण्यासाठी सदैव तत्पर राहील त्याचबरोबर तुमच्या सारख्या पत्रकार मंडळींची सुद्धा सात आवश्यक आहे जेणेकरून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजसेवेला हातभार लावू असे मत त्यांनी व्यक्त केले

यावेळी या सत्कार कार्यक्रमास व्हाईस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चेतन कात्रे, जिल्हाध्यक्ष अमर चोंदे, तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे, प्रसिद्धीप्रमुख दिपक माळी, पत्रकार रामराजे जगताप, रसूल तांबोळी,  राहुल हौसलमल, सलमान मुल्ला, जयनारायण दरक, लक्ष्मण पाटोळे, नवनाथ बारबोले, नाना फाटक, शिवप्रसाद बियाणी अदि पत्रकार उपस्थित होते.


 
Top