नळदुर्ग / प्रतिनिधी-

धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त दि.५ एप्रिल रोजी नळदुर्ग येथील रोकड्या हनुमान मंदिरात वृक्ष लागवड करून पोलिस अधीक्षकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन रोकड्या हनुमान मंदिर समितीचे भीमाशंकर बताले यांनी केले होते.

         जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे वृक्षप्रेमी म्हणुन ओळखले जातात. धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्या वृक्षांचे जतन करण्याचे काम पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे त्यामुळे त्यांना जिल्ह्यात वृक्षसाहेब म्हणुनही संबोधले जाते. दि.५ एप्रिल रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा वाढदिवस साजरा झाला. नळदुर्ग येथील रोकड्या हनुमान मंदिर समितीने पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त रोकड्या हनुमान मंदिर परिसरात वृक्ष लागवड करून त्यांचा वाढदिवस साजरा केला. याठिकाणी माजी नगरसेवक बसवराज धरणे व पत्रकार विलास येडगे तसेच रमेश पिस्के यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष पुदाले,मंदिर समितीचे मुकुंद नाईक,भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार,उमेश नाईक पत्रकार दादासाहेब बनसोडे,अजित चव्हाण,सुदर्शन पुराणिक, पिस्के,एसबीआरचे अध्यक्ष विजयसिंह ठाकुर यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.        यावेळी पर्यावरण पुरक असणाऱ्या पिंपळ, वड या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.


 
Top