उमरगा/ प्रतिनिधी-

शहराचे ग्रामदैवत महादेव   मंदिराच्या यात्रा महोत्सवानिमित्त सोमवारी (ता. ३) सांयकाळी " श्री " च्या काठीची शहरातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान मिरवणूकीत सादरीकरण केलेल्या धार्मिक व पौराणिक सजीव देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधले होते.

ब्रम्हा, विष्णू व महेश यांचे वास्तव्य असलेल्या हेमाडपंथी ग्रामदैवत महादेव   मंदिराच्या यात्रेनिमित्त देवस्थान पंचकमेटीच्या सलग पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी सांयकाळी  युवा नेते किरण गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दिग्विजय शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षिरसागर, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा संगीता कडगंचे, महाविर कोराळे, किशोर शिंदे, अविनाश जोशी यांच्या हस्ते श्रीच्या काठीची विधीवत पुजा आणि आरती करण्यात आली. या वेळी महादेव देवस्थान पंचकमेटीचे अध्यक्ष सखाराम भातागळे, बाबुराव सुरवसे, महावीर कोराळे, राम पौळ, व्यंकट शिंदे, बळीराम कोराळे, करबस शिरगुरे, राजू दामशेट्टी, चंद्रकांत मजगे, शिवा मुरमे, भरत भोसले, दिलीप इंगळे आदींची उपस्थिती होती. मिरवणूकीत  अनेक उत्साही तरूणांनी हलगीच्या तालावर मोठ्या कौशल्याने काठी उचलण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बँजोच्या तालावरही तरुणांनी जल्लोष साजरा करत मिरवणूकीत रंगत वाढविली. अनेक वर्षाची परंपरा असलेल्या सोंगाच्या गाड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. श्रावणी पांचाळ आणि श्रद्धा पांचाळ यांनी सादर केलेल्या महादेव पार्वतीच्या देखाव्यास प्रथम, द्वितीय क्रमांक माळसा जमादार, नंदिनी जोळदापके आणि साक्षी दळगडे गुरूप्रसाद दळगडे यांनी सादर केलेल्या महादेव पार्वतीच्या देखाव्यास विभागुन देण्यात आला तर तृतीय क्रमांक सई बिराजदार व सुरज शिंदे यांच्या राधाकृष्ण देखाव्यास देण्यात आला. रोहिम मुरमे यांच्या साईबाबा, जान्हवी मुरमे यांच्या जिजाऊ, विशाल कलशेट्टी व वैशाली कलशेट्टी यांच्या जय मल्हार आणि संत तुकाराम आणि बालभजनी मंडळाला उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.   विनोद कोराळे, नितीन सुर्यवंशी, प्रा. सचिन शिंदे, पत्रकार अविनाश काळे, किशोर शिंदे, दत्तात्रेय शिंदे, अमर शिंदे, कैलास शिंदे, राजेंद्र सुर्यवंशी, नरेंद्र इंगळे, अमर शिंदे, दिनेश शिंदे, तानाजी शिंदे, मेघराज आरळे, गोविंद सुरवसे, अमोल मिरकले, अभंग शिंदे, सोनू आरळे आदींनी यासाठी पुढाकार घेतला. पोलिस निरीक्षक मनोज राठोड, सहायक पोलिस निरीक्षक महेश क्षिरसागर, रमेश जाधवर यांनी मिरवणूकीसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.


 
Top