धाराशिव / प्रतिनिधी-

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे अंतर्गत 19 वर्षाखालील मुले राज्य संघ निवड पूर्व क्रिकेटचे सामने येरमाळा-बार्शी रस्त्यालगत धाराशिव जिल्ह्याचे होम ग्राउंड शिराळा या ठिकाणी होतआहेत महाराष्ट्र्र क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष दत्ता बंडगर यांनी पाठपुरावा करून शिराळा येथील क्रिकेट मैदान एमसीएकडे नोंदणीकरून घेतले. त्यामुळे आता राज्यस्तरीय क्रिकेट अंडर -19 -लीग.2023- 24 हे क्रिकेटचे सामने येथे होत असून धाराशिवकरांना हे सामने पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

 शिराळा येथील मैदानावर दि. 13 एप्रिल रोजी सामना क्रमांक 1 कोल्हापूर विरुद्ध पीवायसी पुणे, सामना क्रमांक 2 कोल्हापूर विरुद्ध सांगली दि. 16 व 17 एप्रिल, सामना क्रमांक 3 कोल्हापूर विरुद्ध रायगड दि. 20 व 21 एप्रिल आणि सामना क्र 4 सांगली विरुद्ध रायगड  दि. 23 व  24 एप्रिल रोजी होणार आहे. हे सामने दोन दिवसीय असतील. सामन्यांची वेळ सकाळी 9:00वाजता आहे. तरी धाराशिव जिल्ह्यातील सर्व क्रिकेटप्रेमींनी हे सामने पाहण्यास यावे.असे आवाहन धाराशिव जिल्हा क्रिकेट असोशिएनचे अध्यक्ष विजय दंडनाईक आणि सचिव दत्ता बंडगर यांनी केले आहे.


 
Top