धाराशिव / प्रतिनिधी-

भारत देशामध्ये उत्पादित होणाऱ्या गुळ पावडर मध्ये धाराशिव जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न कायमचा सोडवण्यास मदत होणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण ११ गुळ उत्पादन प्रकल्प आहेत, यामार्फत जिल्ह्यातील बराचसा ऊस या कारखान्यामध्ये गाळप केला जातो, या कारखान्यामुळे धाराशिव जिल्ह्यास कारखानदारी क्षेत्रामध्ये वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

  धाराशिव जिल्ह्यातील या गुळ पावडर उत्पादक संघटनेची बैठक शहरात पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील चालू कारखाने व नव्याने होत असलेल्या कारखान्यांचे चेअरमन उपस्थित होते.

या बैठकीमध्ये आगामी हंगामातील ऊस तोडणी वाहतुकीचे करार यांच्या रकमेसह, जिल्ह्यामधील ऊस पुरवठा, उसाला देण्यात येणारा भाव, तोडणी व वाहतूक, उसासंदर्भात आगामी व्यवस्थापन अशा विविध विषयांवर चर्चा झाली. धाराशिव जिल्हा हा गुळ पावडर उत्पादनामध्ये अग्रेसर आहे या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये नियोजनबद्ध एकसूत्री कार्यक्रम राबविला जाणार आहे.

सदरील बैठकीस मोहेकर अग्रो चे अध्यक्ष हनुमंत मडके, डी.डी.एन.एस.एफ.ए.चे चेअरमन विजय नाडे, रुपामाता शुगर चे अध्यक्ष व्यंकटराव गुंड, श्री सिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी, कुलस्वामिनी शुगर चे मधुकर तावडे, सतीश दंडनाईक, अनिल काळे, आदित्य पाटील, बालाजी पाटील, संजय पटवारी आदी उपस्थित होते. 

 
Top