तेर / प्रतिनिधी

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती )नागपूर. महाराष्ट्र शासनाच्या  इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण उस्मानाबाद यांच्या विद्यमानाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खुली चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संत विद्यालयातील इयत्ता नववी मधील विद्यार्थिनी  माजिया जुनेद मोमीन हिने प्रथम जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला या विद्यार्थिनीला रोख रक्कम 5000 प्रशस्तीपत्र व ट्रॉफी बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र संत विद्यालयात मुख्याध्यापक  बेदरे जे. के .यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. यावेळी  जुनेद मोमीन  ,बळवंतराव एस .एस., शितोळे एम. एन.  , कोळी एस. टी.  , घाडगे एस. डी. , भंडारे एम. एन.  , बोराडे जे .बी. , गोडगे एस. यु. , वाघेरे ए. बी., देवकते आर .एम. , चव्हाण एल. टी ., गांगुर्डे एस. टी., प्रा.सूर्यंकांत   खटिंग  , अक्षर भारती, पुणे समन्वयक  गणेश वागस्कर, ऋषिकेश गोरे व आदी उपस्थित होते.

 
Top