धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिव तालुक्यातील धारुर, वाडीबामणी आणि बामणी येथील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पीकांची पाहणी करून  नुकसान झालेला शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना  खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिल्या. 

    गेल्या काही दिवसांपासून सबंध जिल्हाभरामध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या सर्व पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गीक आपत्तीने हिसकावला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गारपीट व अवकाळी पाऊस झालेल्या मंडळामध्ये द्राक्ष, टरबुज, खरबुज, कांदा, ज्वारी, गहु, हरभरा, आंबा तसेच ऊस पीकाचे प्रचंड नुकसान झाले गारपीटीनंतर 18 तासापेक्षा जास्त कालावधीमध्ये शेतामधील गारांचा खच तसाच होता अचानक झालेल्या गारपीटीमुळे काढणीसाठी तयार झालेल्या द्राक्ष पीकांचे नुकसान होवुन बऱ्याच ठिकाणी द्राक्ष बागेची मांडप (फाऊंडेशन) उपटुन पडले यामुळे विक्रीयोग्य द्राक्षपीक काही तासातच जमिन उध्द्वस्त झाले. गारांच्या मारामुळे टरबुज व खरबुजाची फळे जागेवर फटली तसेच काढणीयोग्य झालेली ज्वारी, हरभरा व गहु पीकांची वाताहत झाली. आज दि. 15/04/2023 रोजी धाराशिव तालुक्यातील धारुर, वाडीबामणी व बामणी या गावातील अवकाळी पावसाने व गारपीटीने नुकसान झालेल्या शेतीपीकांची पाहणी शेतकऱ्यांच्या थेट शेतावर जाऊन केली. सदर भागात नुकसान झालेल्या शेतीपीकाची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, पालकमंत्री श्री. तानाजी सावंत यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांना कोणत्याही ठोस मदतीचे आश्वासन दिले नाही. तसेच प्रशासनाकडे सदर नुकसानीच्या अनुषंगाने चौकशी केली असता सततच्या पावसाने नुकसान झाल्याने शेतीपीकांकरीता नुकसान भरपाई देण्याचा अद्यादेश मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. प्रचंड मेहनत करुन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणतीही दिलासादायक घोषणा यावेळी मुख्यमंत्री अथवा पालकमंत्री यांच्याकडून करण्यात आली नाही. वाताहत व हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. नुकसान झालेला शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशा स्पष्ट सुचना तहसिलदार, कृषी अधिकारी यांना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिल्या. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेकरीता सदर पंचनामे तात्काळ पुर्ण करून पंचनाम्याचा अहवाल शासनास लवकरात लवकर सादर करण्याबाबतच्या ही सुचना यावेळी खासदार श्री.राजेनिंबाळकर यानी दिल्या.

 याप्रसंगी तालुकाप्रमुख सतिश सोमाणी, रवि कोरे, दिनेश बंडगर, मोईन पठाण, तलाठी, मंडळ अधिकार, कृषि अधिकारी, ग्रामसेवक, प्रशासकीय अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top