धाराशिव / प्रतिनिधी-

 सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांचा निरोप समारंभ हा पोलीस मुख्यालयात महिना अखेरीस नियमीतपणे आयोजित केला जातो. उस्मानाबाद पोलीस दलातील अधिकारी- पोलीस निरीक्षक सुनिल भिमराव गिड्डे, पोलीस उप निरीक्षक   सुर्यकांत आनंदे, श्रेणी पोउपनि    सुरेश जाधव, भाऊसाहेब जगताप, पोलीस सहाय्यक फौजदार-   अनंत वाघमारे, पोलीस नाईक अशोक शेवाळे, पोलीस अंमलदार मधुकर काळे या 7 व्यक्तींचा सेवानिवृत्त निरोप समारंभ दि. 31.03.2023 रोजी पोलीस मुख्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी   पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी,  अप्पर पोलीस अधीक्षक   नवनीत कॉवत यांच्या हस्ते त्यांचा सन्मान  करण्यात आला. 

निरोप समारंभादरम्यान मा. पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या भावी जिवनास शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमास सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार हे कुटूंबीयांसह उपस्थित होते. समारंभादरम्यान नोकरीतील अनुभव कथन करताना सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार यांचे डोळे पानावले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सपोनि   भराटे यांनी केले. तसेच सेवानिवृत पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या हास्ते पोलीस मुख्यालय परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.


 
Top