तेर / प्रतिनिधी

संतश्रेष्ठ श्री.गोरोबा काका मंदिर व परिसर विकासासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी रु.७ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.   आजवर पहिल्यांदाच या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून संतश्रेष्ठ श्री गोरोबा काका व सहाव्या शतकातील पुरातन कालेश्वर मंदिराचे श्रेष्ठत्व जोपासणारी व मंदिराच्या मुळ स्थापत्य वैभवाला साजेशी विकासकामे करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, बांधकाम विभाग (जि. प.) व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह त्यांनी या परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मंदिराच्या संवर्धनासह दोन्ही मंदिरासमोर भव्य सभामंडप, भक्त निवासाचे उर्वरित बांधकाम, तेरणा नदीच्या पश्चिम बाजू कडील घाट बांधकाम, परिसरात बागबगीचा व सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

तेरचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वास्तुविशारद सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी मंदिर विकासाचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. या आराखाड्या प्रमाणे विकास कामे करण्यात येणार आहेत. भाविकांची संख्या, यात्रा कालावधीतील गर्दीचे व्यवस्थापन व आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच ओव्हरीच्या खिडक्या संत गोरोबा काका मंदिरास  लागुन असलेल्या सभामंडपाच्या कमानी प्रमाणे करणे, ओव्हरीला लाल मातीच्या कामातील स्वरुप दिसुन येण्यासाठी आवश्यक उपाय योजना करणे, ओव्हरी मधील मोकळया जागेत दगडी फ्लोरींग   बसविणे, संत गोरोबा काका मंदिरा समोरील पत्र्याचे शेड काढुन मुख्य मंदिर अधोरेखीत होईल अशा प्रकारे छताचे नियोजन करणे, पुर्व बाजुच्या ओव्हरीचे बाधंकाम मुळ मंदिराच्या स्थापत्याला साजेसे करण्यासह तिन्ही  बाजुचे दरवाजे  पुर्व बाजु कडील दरवाज्या प्रमाणे दगडी स्वरुपाचे  करण्याच्या सुचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थीत अधिकाऱ्यांना दिल्या. 

या वेळी अधीक्षक अभियंता  बी.एम. थोरात, कार्यकारी अभियंता एस.के. चव्हाण, कार्यकारी अभियंता जि.प.  नितीन भोसले,  पुरातत्व विभागाचे सहायक संचालक  अमोल गोटे,  अजिंक्यतारा कन्सल्टंसीचे  वस्तुविशारद  गौरव ठाकरे, गोरोबा काका मंदिर देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक. साहेबराव सौदागर वस्तुसंग्राहालय बाधकाम कंत्राटदाराचे अभियंते  परमेश्वर हिंगमिरे, संत यांच्यासह माजी जि. प. उपाध्यक्ष .शिवाजीराव नाईकवाडी,  सतीश दंडनाईक, उपसरपंच श्रीमंत फंड, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, पदमाकर फंड, विठ्ठल लामतुरे,  अजित कदम,जूनेद मोमीन, मज्जिद मणियार,  विलास रसाळ यांच्या सह इतर सबंधीत अधिकारी व ग्रामस्थ उपस्थीत होते.

 
Top