धाराशिव / प्रतिनिधी-

  येरमाळा ता.कळंब  येथील जनहित पतसंस्थेचे संस्थापक तथा सहकार भारतीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रा. संतोष तौर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई या संस्थेच्या निमंञीत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांच्या हस्ते त्यांचा  सत्कार करण्यात आला.

 प्रा .संतोष तौर यांनी येरमाळया सारख्या ग्रामिण भागात जनहित पतसंस्थेची स्थापना करून सहकार क्षेञात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत| संस्थेला  यापुर्वी दिपस्तंभ, कर्नाड रिसर्च बँकींग, बँको ब्ल्यु  रिबन  व सहकार रत्न पुरस्कार प्राप्त झालेले आहेत  त्यांच्या  या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी  त्यांची  निमंञीत सदस्यपदी निवड केली आहे यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतिश देशमुख,रामकिसन कोकाटे, अँड महेंद्र कासार, अभिषेक कोळगे शाम गंगावणे आदींची उपस्थिती होती.


 
Top