उमरगा/ प्रतिनिधी-

 येथील मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विक्रांत सूर्यवंशी तर सचिव पदी सुभाष काळे यांची निवड करण्यात आली.गुरुवारी (दि.३०)रोजी हॉटेल राजवाडा येथे अडँ हिराजी पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली महामानव, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची बैठक घेण्यात आली. या वेळी ही निवड करण्यात आली.

अध्यक्ष म्हणून विक्रांत सूर्यवंशी, उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, कोषाध्यक्ष राहुल कांबळे तर सचिव पदी सुभाष काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

  या वेळी अविनाश भालेराव, दत्ता सोनकांबळे, दयानंद बेळंबकर,व्ही.एच. कांबळे, रमेश जकाते,एन.एल. गायकवाड, उमाजी गायकवाड, गो.ल. कांबळे,राजु सूर्यवंशी,संतोष सुरवसे,प्रा. सूर्यकांत वाघमारे,धीरज बेळंबकर,समीर सुतके,अंबादास जाधव,आदींची उपस्थिती होती.बोधिसत्व,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने समितीच्या वतीने जाहीर व्याख्यान व समाजप्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


 
Top