धाराशिव /प्रतिनिधी

तालुक्यातील बेंबळी येथील श्री सरस्वती माध्यमिक  व उच्च माध्यमिक  विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी माने यांचा सोमवारी (दि.3) गुण गौरव सोहळा आयोजीत केला आहे.

बेंबळी येथील सास्तुरे कॉर्नर परिसरातील वेलकम मंगल कार्यालयात सोमवारी (दि.3) सकाळी दहा वाजता आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी माने यांचा आ. विक्रम काळे यांच्या हस्ते गुणगौरव सोहळा होणार आहे. 

कार्यक्रमास प्रियदर्शनी संस्थेचे अनील गिरवलकर अध्यक्षस्थानी राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणुन मुस्तफा इनामदार, बापु शिंदे, पांडुरंग व्हनसाळे, भाऊसाहेब पाटील, अ‍ॅड. विजय भोसले, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top