धाराशिव / प्रतिनिधी-

 महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देविजींचा चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सव दि.03 एप्रिल ते 07 एप्रिल 2023 या कालावधीत संपन्न होत आहे. या यात्रा कालावधीत महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर श्री देविजींचे दर्शनासाठी येतात.

  यात्रा कालावधीमध्ये श्री तुळजाभवानी मंदिर आणि मंदिर परिसराची सुरक्षा तसेच भाविकांना सोई-सुविधा पुरविण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व तयारी बैठक दि.17 मार्च 2023 रोजी पार पडली आहे.

 या बैठकीमध्ये अध्यक्ष महोदयांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी तात्काळ करण्यासाठी कंट्रोल रुम, विद्युत व्यवस्था, पाणी पुरवठा, स्वच्छता, गर्दी नियंत्रण, अतिक्रमण, पार्कींग, वाहतूक व्यवस्था, आरोग्य विषयक बाबी, सुरक्षा व दक्षता विषयक, मंदिरातील शिस्तीबाबत, परिवहन महामंडळ, May I Help You कक्ष आदीबांबत सर्व विभाग प्रमुखांनी जबाबदारीने चोख व्यवस्था पार पाडण्याच्या सूचना श्री. खरमाटे यांनी केल्या.


 
Top