तेर /प्रतिनिधी

धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त शासकीय आयुर्वेद रूग्णालय धाराशिव यांच्या वतीने 18 एप्रिलला आयुर्वेद सर्व रोगनिदान उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात संधिवात,अमलात, आम्लपित्त, त्वचारोग,मुळव्याध,स्त्रीयांचे गर्भाशयाचे विकार, वंध्यत्व,थाॅयराइविकार,कान-नाक-घसा विकार,बालकांचे विविध विकार,स्वर्णबिंदुप्राशन ,कंबर-मान-पाठदुखी,पोटाचे विकार,श्वासाचे विकार,अॅलर्जि इत्यादी विकार मोफत निदान व उपचार शिबिर आयोजित केले आहे.याचा लाभ घ्यावा असे आवाहन धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद रूग्णालयाचे अधिष्ठाता प्रा.डाॅ.एन.एस.गंगासागरे यांनी केले आहे.


 
Top