तेर/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील बाराखांबी मंदिर परीसरात सापडलेले शिल्प हे साधारण अकराव्या , शतकातील असून.त्याचे जतन व संवर्धन व्हावे म्हणून तेर येथील संग्रहालयात स्थलांतरित करण्यात आल्या आहेत.  11 व्या शतकातील हेमाडपंथीय  बाराखांबी सकलेश्वर शिवमंदिर आहे ,2002,2006,2016व  2017 साली या परिसरात खोदकाम करताना या मुर्त्या सापडल्या होत्या.पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक पदाचा कार्यभार अमोल गोटे यांनी स्विकारल्या नंतर  .या घटनेच्या तब्बल वीस वर्षानंतर या अस्ताव्यस्त पडलेला पुरातन ठेव्याची पहाणी केली.

 हा पुरातन ठेवा जतन व संवर्धन होणे आवश्यक असल्याने तेर ता.धाराशिव येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय येथे सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतरित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. पुरातत्व विभागाचे छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांच्या निगराणीखाली अंबाजोगाई येथून 4 ते  5 आयशर मध्ये व्यवस्थित रित्या या मुर्त्या तेर येथे आणल्या गेल्या . अंबाजोगाई येथून उत्खननात सापडलेले शिलालेख,मुर्त्या,शिळा,मंदिराचा आतील भाग, अनेक देव देवतांच्या मुर्त्या,यांचा समावेश आहे  यातील कांही मुर्त्या चांगल्या आहेत तर काही मुर्त्याना इजा पोहोचलेली आहे.

 तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय  पुराणवस्तू संग्रहालय येथे या मुर्त्या ठेवल्या आहेत. कै..रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयामध्ये 24932 पुरातन वस्तू आहेत अंबाजोगाई येथील बाराखांबी मंदिर परिसरातील 118  मुर्त्या याठिकाणी आणल्या गेल्यामुळे तेरच्या संग्रहालयातील पुरातन वस्तूची संख्या 25 हजार  पुढे गेली आहे. 

 
Top