धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिव तालुक्यातील काजळा या ठिकाणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने वाईट ट्वेंटी चौपाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमांतर्गत G 20 बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वाय ट्वेंटी च्या मुद्द्यावर तरुणांकडून विविध कल्पना मिळवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात बाजीराव जाधवर यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये त्यांनी हवामान बदल,शाश्वत जीवनाचा मार्ग बनवणे,भविष्याच्या दृष्टिकोनातून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी तरुणांचा सहभाग वाढवणे,शेती विषयी शासनाच्या विविध योजना,तरुणातील ई साक्षरता अशा विविध मुद्द्यांना स्पर्श करत माहिती दिली. याचबरोबर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर देखील या कार्यक्रमात  चर्चा करण्यात आली. या अडचणीवर  मार्ग काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील अशी माहिती भाजप युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष राजे निंबाळकर यांनी दिली.तसेच काजळा गावातील विविध कार्यकारी सोसायटी चे नवनिर्वाचित चेअरमन  राजुळ पवार व नवनिर्वाचित संचालक यांचा राजसिंह राजेनिंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 या कार्यक्रमासाठी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर,माजी सरपंच विष्णुदास आहेर, सरपंच प्रवीण पाटील ,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजूळ पवार,भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी,हिम्मत भोसले ,भाजप युवा मोर्चा काजळा शाखेचे अध्यक्ष मनोज कदम,आकाश हाजगुडे,अमोल मडके,दीपक हाजगुडे,राजेश हाजगुडे, विकास राऊत आदींसाठी काजळा गावातील भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top