तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला. प्रथमतः सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व जेष्ठ महिला यांच्या हस्ते करण्यात आले.यानतंर शाल, पुष्पहार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी सरपंच ज्योतीका चव्हाण यांनी आपल्या मनोगतात जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले . यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, अमृता चव्हाण, पांडुरंग चव्हाण,पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या रेखाताई चव्हाण,धानाबाई राठोड, ग्रंथपाल रेश्मा चव्हाण, हॅलो फाउंडेशनच्या प्रेरिका रिना चव्हाण,सुरताबाई राठोड,रमनाबाई राठोड,मोताबाई राठोड,घमाबाई राठोड ,वालाबाई राठोड,मोताबाई वालु राठोड, कमलाबाई चव्हाण, लक्ष्मी जाधव,विद्या राठोड , मोतीराम राठोड, सिद्राम पवार,किरण चव्हाण,शंकर राठोड, अवि राठोड, संदीप राठोड, सतिश राठोड, विक्रम चव्हाण राहुल राठोड आदिजण उपस्थित होते.


 
Top