कळंब/ प्रतिनिधी-

 नुकतेच राजस्थान सरकारने आर टी एच- राईट टू हेल्थ हे  बील असेंब्ली मध्ये पारीत केले आहे. सदरील बील खाजगी डॉक्टर्स, हॉस्पिटल्स व पेशंट साठी खुपच अन्यायकारक असुन त्याचा इंडियन मेडिकल असोसिएशन, संपूर्ण देशात दि २७/०३/२०२३ सोमवार हा काळा दिवस ⚫ ब्लॅक डे पाळून जाहीर निषेध केला आहे.  

 या बिलाचा विरोध करणाऱ्या असंख्य आंदोलन करत्या डॉक्टर्स वर जयपूर येथे अमानुष पणे केलेल्या लाठीचार्ज घटनेचा निषेध व्यक्त  केला. चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असुन नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. राजस्थान सरकार या जबाबदारी पासून पळ काढत असुन खाजगी डॉक्टर्स ना वेटीस धरत आहे. गंभीर पेशंट वर खाजगी डॉक्टर्स नी विनामूल्य उपचार करावेत अशी तरतूद या विधेयकात आहे.   या प्रकारच्या सेवा नाकारणाऱ्या डॉक्टर व हॉस्पिटल वर सरकार दंडात्मक कारवाई करु शकते.   अन्यथा इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे संपूर्ण देशात आरोग्य सेवा बेमुदत बंद ठेवली जाईल व होणाऱ्या परिणामांस सरकार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. 

या संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन विभागीय अधिकारी मा अहिल्या गाठाळ यांना देण्यात आले. 

या निवेदनावर अध्यक्ष डॉ कमलाकर गायकवाड, सचिव डॉ सत्यप्रेम वारे, कोषाध्यक्ष डॉ शिल्पा ढेंगळे, माजी प्रदेशाध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे, डॉ दिपक कुंकूलोळ, डॉ दिनकर मुळे, डॉ अरूणा गावडे, डॉ अभिजित लोंढे,  डॉ सुशील ढेंगळे, डॉ महादेव कोरसळे, डॉ महेश सपकाळ, डॉ हनुमंत गव्हाने, आदिंच्या सह्या आहेत.

 


 
Top