धाराशिव / प्रतिनिधी-

 अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) महिला आघाडीच्या सोलापूर शहर निरीक्षकपदी शीला उंबरे यांची निवड करण्यात आली आहे.

 धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्या तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी शीला उंबरे यांची सोलापूर शहर निरीक्षकपदी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सवालाखे व राष्ट्रीय अध्यक्ष डिसूजा यांनी ही निवड केली आहे. या निवडीबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास  शिंदे, जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, न्याय व विधी विभागाचे ॲड विश्वजीत शिंदे, प्रभाकर लोंढे, सिद्धार्थ बनसोडे, महबूब पटेल, उस्मानाबाद शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, उमेश राजेनिंबाळकर आदींनी अभिनंदन केले आहे.


 
Top