धाराशिव / प्रतिनिधी-

लिंगायत समाजाचे आराध्य दैवत बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे   विभागीय अभ्यास शिबीर घेण्यात आले. बसव ब्रिगेड व अखिल भारतीय लिंगायत मंच यांच्या वतीने मराठवाडा विभागातील जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्या उपस्थितीत  हे शिबीर झाले. 

या शिबिरात विषय(१)लिंगायताचा इतिहास (२) लिंगायत धर्म (३) लिंगायताची जनगणना (४) प्रत्येकाला बोलतं करणं (५)बश्वेश्वरांचे विचार सर्व धर्माप्रयंत पोहचले पाहिजे (६) बसव ब्रिगेडची लिंगायत समाजाला गरज काय(७) पोटजाती एकत्रित करणे (८)बसव ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांला प्रत्येक मुद्दा खोडून काढून त्याला आपलेसे करण्यासाठी हे शिबिर आयोजित केले होते.

या सर्व गोष्टींचा अभ्यास अविनाश भाऊ भोसीकर (बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष), प्रदिप भाऊ बुरांडे,विरेंद्र मांगलगे,किर्तीकुमार बुरांडे, सुनिल हिंगने सरांच्या यांचे मार्गदर्शन केले प्रत्येक पदाधिकारी यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली व त्यांच्या शंकेचे निरसन केले.प्रत्येक वक्तव्यानी खुप छान आणि विस्तुर्त माहीती दिली.प्रत्येक पदाधिकारी यांना या शिबिरात बोलते केले.कधिही व्यासपीठावर येऊन न बोलणारा व ग्राऊंडवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला या शिबिरात व्यासपीठावर बोलाऊन बोलतं केलं.त्याच्याकडून अनुभव त्याचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नांचे निरसन केले.असेच शिबिर प्रत्येक जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर घेण्याचा संकल्प राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर यांनी या शिबिरात केला.तसेच काही दिवसांतच धाराशिव जिल्हयाच्या ठिकाणी मोठं आंदोलन उभारणा असल्याची माहीत धाराशिव जिल्हा समन्वयक रवि कोरे आळणीकर यांनी दिली.


 
Top