तुळजापूर/ प्रतिनिधी-

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ तुळजापूर (खुर्द ) येथे  शाळेत शिक्षण घेवुन डाँक्टर झालेल्या  प्रतीक्षा पंडितराव जगदाळे व इंजिनियर झालेल्या   श्वेता हरिश्चंद्र जगदाळे या दोन्ही विद्यार्थिनींचा सत्कार नगर परिषद, तुळजापूरच्या माजी शिक्षण सभापती  मंजुषा  देशमाने  आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा  लक्ष्मी  भोजने यांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला.

  याप्रसंगी  .श्वेता  जगदाळे व   प्रतीक्षा  जगदाळे दोघींनी शाळेस 2 डिजिटल बोर्ड   भेट दिले.    तसेच श्री. तुळजाभवानी पुजारी मंडळ, तुळजापूर यांच्या वतीने ९०० वह्याचे वाटप उपाध्यक्ष विपीन शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.   जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शाळेतील शिक्षिका  निता गायकवाड,  निर्मला कुलकर्णी , प्रणिता मोरे , ज्योती ताटे,  दिव्याराणी हुंडेकरी , यास्मिन सय्यद,   सरस्वती कदम, शोभा कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

  कार्यक्रम प्रसंगी शाळेतील शिक्षक  अशोक शेंडगे, जालिंदर राऊत , विश्वजीत निडवंचे, रविकुमार पवार, सतीश यादव, सेवक  संदीप माने यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अशोक शेंडगे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक  तुकाराम मोटे यांनी मानले.


 
Top