तुळजापूर/ प्रतिनिधी-

  जागतिक महिला दिनानिमित्त धारुर येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेत महिला वर्गाच्या मागणीचा आदर करीत अवैध दारु विक्री  बंद करण्याचा ठराव घेण्यात आला.

या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच  बालाजी पवार हे होते.  प्रामुख्याने गावातील अवैध दारु विक्री केली जात होती त्याला आळा बसावा या उद्देशाने गावातील संपूर्ण महिला भगिनी यांनी मागणी केली तसेच अवैध दारू विक्री बंदी करण्यासाठी ठराव संमत करण्यात आला. यावेळी उपस्थित गावातील गावकरी मंडळी तसेच माता, भगिनी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ग्रामसभा यशस्वी केली. यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच बालाजी  पवार, ग्रामसेवक अहिरे ,  उपसरपंच पांडुरंग लोहार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व नागरिक गावकरी मंडळी, सामाजिक कार्यकर्ते , माता भगिनी यांनी विशेष हजेरी लावून ग्रामसभा यशस्वी पार पाडली. 


 
Top