तुळजापूर/ प्रतिनिधी-

 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन नेहरू युवा केंद्र  नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे उद्घाटन खा. ओमराजे निंबाळकर यांच्या  हस्ते   करण्यात आले. यावेळी  महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटांना फिरता निधी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात अाला. 

या कार्यक्रमासाठी नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ तुळजापूर, स्वामी विवेकानंद युवा मंडळ,   महिला आर्थिक विकास महामंडळाचे गट तसेच नेहरू युवा केंद्राचे विविध मंडळांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला  तसेच बचत गटाच्या माध्यमातून स्टॉल लावण्यात आले तसेच तुळजापूर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने युवतींसाठी महिलांसाठी आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात  आले . 

प्रारंभी   प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मीना  सोमाजी यांनी केले. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक धनंजय काळे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेच्या नेहरू युवा केंद्राचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top