धाराशिव / प्रतिनिधी-

  भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी व सहकाऱ्यांनी देशाचे नेते राहुल गांधी यांच्या बद्दल असभ्य भाषेत घोषणाबाजी केली तसेच भाजप जिल्हाध्यक्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अपशब्द वापरून रस्त्यावर फिरू न देण्याची वल्गना केली आहे. 

याचा जाहीर निषेध करून मी भाजप जिल्हाध्यक्षांना सांगू इच्छितो की, काँग्रेसचा विचार हा देशाचा विचार आहे. आम्ही लोकशाही बळकट करण्यासाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी व संविधानाच्या रक्षणासाठी दररोज रस्त्यावर आहोत आपल्यात हिम्मत असेल तर तुम्ही दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे आम्हाला रोखून दाखवावे.

तसेच राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याची अत्यंत खोटी अफवा पसरवून हेतूतः समाजात तेढ निर्माण करीत आहेत. असे चुकीचे वर्तन करू नका व भाषेच्या मर्यादा पाळाव्यात.


 
Top