धाराशिव /प्रतिनिधी- 

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, गोवा मुक्ती संग्राम लढ्यात अग्रेसर असलेले व ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत शंकरराव धाबेकर (वय - 87 वर्षे) रा. धाराशिव यांचे दि.8 मार्च रोजी  दुःखद निधन झाले.

विष्णुपंत धाबेकर हे स्वातंत्र्य सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे सदस्य सचिव होते. त्यामुळे त्यांना राज्य मंत्रिमंडळाचा दर्जा देण्यात आला होता. त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ते मूळचे उस्मानाबाद तालुक्यातील दुधगाव येथील रहिवासी असून गेल्या 30 वर्षापासून उस्मानाबाद शहरात राहत होते. ते विविध दैनिकांमध्ये स्तंभ लेखन करीत होते. तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समिती यासह विविध समितीचे त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. 

 
Top