धाराशिव / प्रतिनिधी-

सामाजिक न्याय विभागाच्या  योजनांची एलईडी रथाद्वारे  जिल्ह्यातील विविध गावांमध्ये  प्रसिध्दी करण्यात येणार आहे. या रथाचे आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या हस्ते फीत कापून तसेच हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आले.

 यावेळी जिल्हा माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी,गणेश नवघणे, अनिल वाघमारे, श्रीकांत देशमुख,शशीकांत पवार,परवेझ सय्यद आदी उपस्थित होते. या रथाद्वारे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर,उदगीर,कळंब,भूम ,वाशी, परंडा आणि उमरगा या तालुक्यातील  गावांमध्ये  योजनांची माहिती दाखविली जाणार आहे.


 
Top