धाराशिव / प्रतिनिधी-

 शहरातील तुळजाई महिला सामाजिक विकास मंडळ सुशीला नगर उस्मानाबाद येथे कराटे क्लास व शिवण क्लासेस चे उद्घाटन दि १ मार्च रोजी झाले .  यावेळी तुळजाभवानी सामाजिक विकास मंडळाच्या संस्थापिका सुवर्णा मुरलीधर कांबळे , महिला कराटे शिक्षिका प्रियंका विशाल काकडे , शिवण क्लास शिक्षिका साहेरा शेख , संस्थाचे प्रकल्प समन्वयक राहुल गायकवाड , कर्मचारी समीना बेग,  हिना सय्यद , दिलशाद सय्यद , कोचिंग क्लास चे शितल शेंडगे , यांच्यासह मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

 महिलांच्या संरक्षणासाठी महिलांना सक्षम करण्यासाठी तुळजाई महिला सामाजिक विकास मंडळाच्या वतीने कराटे क्लास व शिवण क्लास सुरू करण्यात आले आहे याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुवर्णा कांबळे यांनी केले आहे.

 
Top