धाराशिव / प्रतिनिधी- 

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पोलीस कल्याण विभाग अंतर्गत उस्मानाबाद पोलीस मुख्यालय आवारात पोलीसांसाठी ‘सुसज्ज उपहारगृह’ सुरु करण्यात आले. या उपहारगृहाचा शुभारंभ  विशेष पोलीस महानिरीक्षक के. प्रसन्ना यांच्या हास्ते व जिल्हा पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक   नवनीत कॉवत, यांचे उपस्थितीत करण्यात आला. 

हे उपहारगृह पोलीस अधिकारी, अमंलदार व बरोबर सर्वसामान्य नागरिकासाठी खुले असल्याचे उपहारगृह चालविणाऱ्या वर्षाराणी कुदळे यांनी यावेळी सागिंतले. उपहारगृहाच्या उद्घाटनासाठी सहाय्यक  पोलीस अधीक्षक  जैस्वाल, राखीव पोलीस निरीक्षक   दुबे, सपोनि   बारोवकर इतर पोलीस अधिकारी, अमंलदार तसेच कार्यालयनी कर्मचारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top