धाराशिव /प्रतिनिधी

शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी शिक्षक आ. विक्रम काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन  धाराशिव जिल्ह्यातील आश्रम शाळा शिक्षक व कर्मचार्‍यांच्या वतीने शिक्षक प्रतिनिधी सतिश कुंभार यांनी दिले.

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,  शासनाने लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करून, आश्रम शाळा कर्मचार्‍यावरील अन्याय दूर करावा,यासाठी मंऋालय स्तरावर पाठपुरावा करून शिक्षकांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना शिंगोली आश्रम शाळेल शिक्षक प्रतिनिधी सतीश कुंभार,  राष्ट्रवादी शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मेंढेकर , बालाजी तांबे , प्राध्यापक अंकुश  नाडे , निशिकांत देशमुख आदी कर्मचारी उपस्थित होते.

 
Top