धाराशिव / प्रतिनिधी-

सहायक नगर रचनाकार मयुर केंद्रे यांना दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

6 लाख मागणी करुन 5 लाख रक्कम देण्याचे ठरले त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये घेताना केंद्रे यांना काल लाच लुचपत विभागाने रंगेहात अटक केली होती.

सिंदफळ शिवारातील 3 एकर शेतजामीन अकृषी करण्यासाठी ही लाच घेण्यात आली आहे.राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद गटनेते महेंद्र धूरगुडे यांनी तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक संदीप आटोळे व अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सिद्धराम म्हेत्रे, पोलीस निरीक्षक विकास राठोड यांनी ही कारवाई केली. सापळा पथकात पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, विशाल डोके,सचिन शेवाळे, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर,अविनाश आचार्य चालक दत्तात्रय करडे यांनी काम पहिले.


 
Top