तुळजापूर / प्रतिनिधी-

  तालुक्यातील काक्रंबा  येथील विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन राजेंद्र शेंडगे यांच्याविरुध्द संचालकांनी

दाखल केलेला अविश्वास ठराव मंगळवारी झालेल्या बैठकीत  बारा विरुध्द शुन्य मताने मंजूर झाल्याने चेअरमन पदावरुन राजाभाऊ शेंडगे पायउतार झाले.

आपल्या सोबत एक कही संचालक येत नसल्याचे पाहुन अखेर येथील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन राजाभाऊ शेंडगे यांनी सकाळी चेअरमन पदाचा राजीनामा सोसायटी सचिवा कडे दिला होता.   विद्यमान चेअरमन संचालकांना विश्वासात घेत नाहीत, असा आरोप करत १३ पैकी १२ संचालकांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्या अनुषंगाने मंगळवारी तुळजापूर येथील सहायक निबंधक बी. जी. मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली.  यावेळी तेरापैकी बारा संचालकांच्या उपस्थितीत विद्यमान चेअरमन यांच्यावरील अविश्वास ठरावाबाबत चर्चा करून १२ विरुद्ध शून्य अशा मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला.  विशेष सभेला शहाजी देवगुंडे,चनाप्पा वट्टे, दशरथ कोळेकर, गणेश

कोळेकर, शिवाजी हांडे, पद्मराज गडदे, अरुण घोगरे, अरविंद वाघमारे, दत्तात्रय सुरवसे, प्रतिभा हांडे, पुष्पांजली बेडगे अभिमन्यू मस्के असे बारा संचालक उपस्थित होते.   याप्रसंगी  अँड . नागनाथ कानडे, माजी जि. प. सदस्य बालाजी बंडगर, माजी सरपंच व्यंकट झाडे, माजी चेअरमन हरिदास वट्टे, माजी उपसरपंच प्रभाकर घोगरे, ज्ञानोबा  कोळेकर, मोहन हांडे उपस्थित होते.  काक्रंबा सोसायटी मध्ये  एक वर्षासाठी चेअरमन पद देण्याचे ठरले ऐक वर्ष होवुन ही राजाभाऊ शेडगे यांनी राजीनामा न दिल्याने अखेर उर्वरीत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला तो मंजूर झाल्याने अखेर राजाभाऊ शेंडगे यांना पाय उतार व्हावे लागले.


 
Top