तुळजापूर / प्रतिनिधी-

महाराष्ट्र शाषणाने  महिला वर्गास एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत दिल्याने यंदा श्री तुळजाभवानी मातेच्या  चैत्री पौर्णिमा याञेस महिलावर्ग मोठ्या  संख्येने येण्याची शक्यता असल्याने चैञी पोर्णिमा सोहळ्या निमित्ताने   येणाऱ्या भक्तांन   सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना करावे असे  आवाहन उपविभागीयपोलिसआधिकारी तथा विश्वस्त योगेश खैरमाटे यांनी शुक्रवार दि १८रोजी मंदीर प्रशासकीय कार्यालयात   चैत्री पौर्णिमा पुर्वतयारी आढावा बैठकीत केले.

 श्रीतुळजाभवानी मंदिर मध्ये दिनांक 03/04/2023 ते दिनांक 07/04/2023 या कालावधीत चैत्री पोर्णिमा यात्रा महोत्सव संपन्न होत आहे.  यंदाच्या  चैञी पोर्णिमा याञेत  धार्मिक विधी पुर्वपरंपरे नुसार संपन्न होणार आहेत. यंदा निर्बधमुक्त चैञी पोर्णिमा याञा संपन्न होत असल्याने भाविक मोठ्या संखेने येण्याची शक्यता असल्याने घाटशिळ वाहनतळ येथुन भाविकांना मंदीरात सोडले जाणार आसुन  मातंगीदेवी मंदीर व महाध्दारांमधुन भाविकांना बाहेर सोडण्याचे ठरले पुजारीवृदांना महाध्दार मधुन ओळखपञ दाखवुन मंदीरात सोडण्याचा निर्णय घेतला गेला बोगसपुजा-यांन  पकडुन कारवाई करण्याचे ठरले. जुन्या खराब सुतकातील परड्या भाविक मंदीरात सोडुन जातात त्याची विटंबना होवु नये म्हणून संभाजी प्रांगणात यज्ञकुंड करुन विधीवत या परड्या अग्नी देवुध  नष्ट करण्याचे ठरले. भाविकांना स्नानासाठी भवानीतिर्थकुंड सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. याञा कालावधीत रोज पुरेशा दाबाने  पाणीपुरवठा करणे  स्वछतेस प्राधान्य देवुन  अतिक्रमण मुक्त रस्ते ठेवणे अवैध धंदेयाञा काळात पुर्णता बंद ठेवणे  बाबतीत सुचना देण्यात आली.  अखंड चोविस तास विजपुरवठा राहावा यासाठी कायमस्वरुपी दोन वायरमन तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच भक्तांचा आरोग्य सुरक्षेसाठी  प्राथमिक उपचार केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाढत्या गर्दी पार्श्वभूमीवर जुने बसस्थानकात एसटी उभ्या न करता गावाबाहेर उभे करण्यावर चर्चा करण्यात आली.  भक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त ठेवण्याचा सुचना करण्यात आल्या . यंदा वाहनतळे गावाचा चारीही बाह्य भागात निर्माण   करण्याचे ठरले गावात वाहन  प्रवैश करु नयेत यासाठी उपाययोजना करण्याचा सुचना देण्यात आल्या  धाराशिव रस्त्यावर हाडको परिसरात असणाऱ्या मोळक्या मैदानात व ते भरले कि वाहनतळात याञा काळात वाहने उभे करण्याचा  निर्णय घेतला  गेला.

या बैठकीस देविचे महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा,  प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशाषन योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे, विश्वास कदम,  पुजारी मंडळ उपाध्यक्ष विपीन शिंदे, भोपे मंडळाचे सुधीर कदम,  उपाध्य मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो , आरोग्य विभागाचे डाँ एच व्ही होनमाने , मुख्याधिकारी अरविंद नातू सह याञा संबंधित विविध विभागाचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थितीत होते. 


 
Top