धाराशिव / प्रतिनिधी-

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वारंवार स्वा. वि.दा. सावरकर यांच्या विषयी चुकीचे व अतिशय आक्षेपार्ह बोलतात. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सावरकर यांच्याबद्दल काही खऱ्या गोष्टी बोलतात. मात्र त्यांची भूमिका कृतीमधून दिसत नसल्यामुळे ती दिसणे आवश्यक असल्याचे मत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी   व्यक्त केले.

 उस्मानाबाद येथील प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालयात   ते बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवराज नळे, सुनील काकडे, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगडे, दत्तात्रय सोनटक्के आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ पाटील म्हणाले की, राहुल गांधी यांना सावरकर यांचा इतिहास माहीत असताना देखील ते जाणून बुजून त्यांचा अपमान करतात. त्यामुळे त्यांच्या या कृतीचा आम्ही निषेध करीत असून यापुढे त्यांनी याबाबत कुठलाही अपशब्द वापरू नये. तसेच त्यांनी सावरकर यांची माफी मागावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच ठाकरे यांनी सत्तेसाठी सावरकर यांचा अपमान सहन केला. त्यामुळे त्यांच्यातील प्रखर हिंदुत्व कुठे गेले ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे सावरकर यांची नवतरुणांना माहिती हवी यावेळी माजी प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी यांनी लिहिलेले पत्र तर स्व. बाळासाहेब ठाकरे व खा शरद पवार यांनी सावरकर यांच्या विषयीच्या जाहीर सभेत बोललेल्या क्लिप दाखविण्यात आल्या.

 
Top