धाराशिव / प्रतिनिधी-

प्रभू श्री राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज च्या प्रथम चाचणी गळीत हंगामाचा आज दिनांक ३०-०३-२०२३ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते गव्हाण पूजन करून व गव्हाणीत मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी छोटेखानी कार्यक्रमात कारखाना उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या सर्व मशिनरी पुरवठा दारांचा श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदरील कार्यक्रमास खामसवाडी चे प्रथम नागरिक सरपंच अमोल पाटील, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष चेअरमन संजय पाटील, काँग्रेस नेते अशोक बापू शेळके, मोहेकर अॅग्रो चे चेअरमन हनुमंत तात्या मडके, भाजपा जिल्हा सरचिटणीस अॅड.नितीन भोसले, बालाजी कोरे, अॅड.प्रतिक देवळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमातील आपल्या मनोगतामध्ये दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी कारखाना उभारणीमध्ये सातत्याने काम करणाऱ्या कारखान्यासाठी लागणाऱ्या वेगेवेगळ्या मशिनरी पुरवठादार व ठेकेदारांचे आभार मानले, या सर्वच ठेकेदारांमुळे कारखाना हा फक्त ८ महिन्यामध्ये पूर्ण होऊन आज प्रत्यक्षात गाळपास सुरुवात झाली. या कारखान्याचे १५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन करून आज रोजी हा कारखाना शेतकऱ्यांच्या तसेच सभासदांच्या सेवेत दाखल झाला असेही यावेळी ते म्हणाले, एवढ्या कमी कालावधीमध्ये कारखाना पूर्ण झाल्याबद्दल दत्ताभाऊंनी आभार व्यक्त केले. पुढील हंगामामध्ये कारखाना आपला प्रथम चाचणी गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण करणार याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

सदरील कार्यक्रमास ऋषिकेश धाराशिवकर, सुजित साळुंके, अॅड.ऋषिकेश भिंगारे, कारखान्याचे एम.डी.गणेश कामटे, संचालक दिनेश कुलकर्णी, बलराम कुलकर्णी, दयानंद पाटील, विजय शेळके, नानासाहेब सिरसाठ तसेच कारखान्यातील सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top