धाराशिव / प्रतिनिधी-
अंतरिक्ष सहल जिल्हास्तर स्पर्धा परीक्षेत जि.प.कन्या प्रा.शाळा कसबे तडवळे शाळेतील इयत्ता सातवीतील कु.सई किशोर माने हीची निवड झाली आहे.
सई हिने या अंतरिक्ष सहल विज्ञान स्पर्धा परीक्षेत केंद्रात, तालुक्यात व जिल्ह्यात झालेल्या स्पर्धेत आपले व शाळेचे स्थान कायम अव्वल टिकवून ठेवण्यात मोठे यश प्राप्त केले. याबद्दल हीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद आदर्श कन्या शाळेच्या या सहलीसाठी दि.20 मार्च 2023 रोजी उस्मानाबाद (डायट) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव येथे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून जिल्हयातून एकूण प्रत्येक तालुक्यातून तीन असे एकूण 24 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली .यात आपल्या जि.प.आदर्श कन्या शाळा कसबे तडवळे शाळेतील कु.सई किशोर माने हीने मोठे यश संपादन केले.
यासाठी शाळास्तरावर जेष्ठ शिक्षक जगन्नाय धायगुडे, संजय देशटवाड , गणपती यावलकर, अनिता देशमुख, .शीलरक्षा शिंगाडे, .राणी अंधारे, शहाजी पुरी, प्रवीण गाडे व मुख्याध्यापक श रहिमान सय्यद यांनी सखोल मार्गदर्शन केले. यासाठी प्रेरणास्त्रोत बीटच्या विस्तार अधिकारी किशोरी जोशी मॅडम व केंदप्रमुख जगदीश जाकते व शाळा व्यवस्थापन समिती यांनीही कु. सई हीस शुभेच्छा देऊन शाळेचे अभिनंदन केले