धाराशिव / प्रतिनिधी-

महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ बागल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बुधवारी (दि.22) समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली व भाऊसाहेब उंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. जयंतीनिमित्ताने भव्यदिव्य मिरवणुकीसह विविध सामाजिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

 जयंती समितीच्या अध्यक्षपदी राजाभाऊ बागल, कार्याध्यक्ष रावसाहेब शिंगाडे, उपाध्यक्ष भावेश काशीद, योगेश वाघमारे, सचिव नितेश जानराव, सहसचिव प्रज्ञावंत ओहाळ, संघटक राजाभाऊ पवार तर कोषाध्यक्षपदी विशाल शिंगाडे यांची निवड करण्यात आली. तसेच मिरवणूक प्रमुखपदी नितीन गायकवाड, जितेंद्र बनसोडे, बाळू शिंगाडे, सत्यजित माने, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुखपदी सागर चव्हाण, सुगत सोनवणे, संघपाल शिंगाडे, प्रशांत कांबळे, बापू साबळे, सौरभ शिंगाडे, ताहेर शेख, सुमित शिंगाडे, संरक्षण प्रमुखपदी सिद्धार्थ सोनवणे, आकाश माळाळे, आतिश बनसोडे, आकाश वाघमारे, मार्गदर्शकपदी धनंजय शिंगाडे तर सल्लागार सुभाष (नाना) पवार, आबासाहेब खोत, भाऊसाहेब उंबरे, डी.एन. कोळी, नंदकुमार शेटे, लक्ष्मण माने, रवी कोरे आळणीकर, शरणम् शिंगाडे, महादेव लिंगे, शिवानंद कथले, सतीश कदम यांची निवड करण्यात आली. बैठकीचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन लक्ष्मण माने यांनी केले.

 
Top