धाराशिव / प्रतिनिधी-

सौ.प्रतिभा वेदकुमार वेदालंकार यांचे दि.२८ रोजी सकाळी निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर  २९ रोजी सकाळी   9 वाजता धाराशिव येथील कपिलधार स्मशानभूमीत  अंतिम संस्कार करण्यात आले.

ज्येष्ठ साहित्यिक तथा आर. पी. कॉलेजचे सेविनिवृत्त प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांच्या त्या पत्नी होत. मृत्यू समयी त्या सत्याऐंशी वर्ष वयाच्या होत्या.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा हैद्राबाद स्टेटचे माजी मंत्री स्व. शेषराव वाघमारे निलंगा यांच्या त्या कन्या होत्या. त्यांच्या पाठीमागे पती, मुलगा सुमंत, सुन, मुलगी सौ अदिती भूसारी पुणे, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुलगा सुमंत वेदालंकार रोटरी क्लब धाराशिवचे सक्रिय सदस्य आहेत. इंद्रधनू वृध्दसेवा केंद्राच्या नुकताच संपन्न झालेल्या रौप्यमहोत्सवी समारंभात सौ प्रतिभा व श्री वेदकुमार वेदालंकार यांना आदर्श ज्येष्ठ दांपत्य म्हणून गौरविण्यात आले होते.


 
Top