तेर  / प्रतिनिधी 

धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा.परीषद.कन्या प्राथमिक.शाळा येथे मंथन स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांनीना बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला.                                             

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पूजा  रोहिदास या होत्या.  भविष्यात स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना समर्थपणे ते पेलता यावे तशी दृष्टी तयार व्हावी यासाठी  प्राथमिक शिक्षणातच हे बीज रोवले जावे  यासाठी प्रथमच शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी तील  44 विद्यार्थीनींनी मंथन स्पर्धा दिली व त्यापैकी 19 विद्यार्थीनी यशस्वी झाल्या.यशस्वी विद्यार्थीनींना प्रेरणा देण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे नारायण साळुंके ,कलिमा शेख उपस्थित होत्या.शिक्षक पालक संघाचे व माता पालक संघाचे सदस्य .रणू रपकाळ ,.काकासाहेब नाईकवाडी,.जोतीराम भातभागे यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील  रामहरी.पसारे, प्रतिभा जोगदंड सुशिल.क्षिरसागर, पल्लवी पवार यांनी  मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापका सुरेखा कदम यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुशिल.क्षिरसागर  केले तर पल्लवी पवार  यांनी आभार मानले.


 
Top