नळदुर्ग / प्रतिनिधी-

 येथील एैतिहासीक श्री रामतीर्थ देवस्थान येथे श्री राम जन्मोत्सव मोठया उत्साही भक्तीमय वातावरणा मध्ये पार पडला असून यावेळी रामतीर्थ देवस्थान येथे हजारो भाविकांनी श्री रामाचे व हनुमान व श्री महादेवाचे दर्शन घेतले. त्याच बरोबर सर्वांना महाप्रसाादाचे वाटप करण्यात आले. दुपारी साडे बारा वाजता मुख्य गुलालाचा कार्यक्रम घेण्यात आला.

येथील श्री रामतीर्थ देवस्थान मध्ये हजारो भाविकांच्या उपस्थीतीत श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान या महोत्सवा निमीत्त सकाळी साडे वाजल्या पासून महा अभिषेक, रुद्राभिषेक, जलाभिषेक आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी शेकडो जोडप्यांच्या उपस्थीतीत जलाभिषेक करण्यात आला. दुपारी साडे बारा वाजता मुख्य जन्मोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. सर्वत्र भगवे झेंडे लावून मंदीर परिसरात सर्वत्र भगवे वातावरण निर्माण झाले होते. त्याच बरोबर विविध धार्मीक कार्यक्रम ही घेण्यात आले.

प्रारंभी येथील व्यंकटेश नगर येथील हनुमान मंदीरा पासून श्री रामाच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणुक काढण्यात आली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे तरुण सहभागी झाले होते. ज्ञानोबा तुकारामाच्या गर्जने मिरवणुकीस भजनी मंडळांनी सुरुवात केली. ही मिरवणुक व्यास नगर, बसस्थानका समोरुन मुख्य बाजारपेठेतून भवानी चौक मार्गे सावरकर चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक, मराठा गल्ली येथून क्रांती चौक मार्गे चावडी चौकातून मुख्य राष्ट्रीय महामार्गावरुन ही मिरवणुक श्री रामतीर्थ देवस्थान कडे मार्गस्थ झाली. मोहीत कलकोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पालखी मिरवणुक काढण्यात आली. 

रामतीर्थ देवस्थान येथे आजू बाजूच्या ग्रामीण भागातील ही भाविक मोठया प्रमाणात उपस्थीत होते. शहरातील महीला पुरुष, बाल गोपाळ यांच्या बरोबर तरुण मंडळी ही मोठया संख्येने उपस्थीत होते. मुख्य गुलालाचा कार्यक्रम झाल्यानंतर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली. यानंतर सर्वच भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. वरील सर्व कार्यक्रम मंदीराचे विश्वस्त विष्णू शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शना नुसार पार पडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन डुकरे, सुनिल उखंडे, प्रभाकर घोडके, रोहीत मोटे, श्रीकांत पोतदार, लखन भोसले, जेष्ठ पत्रकार विलास येडगे, सुधीर हजारे, पप्पू पाटील, संजय विठठल जाधव, बंडू कसेकर, सौ. सुभद्राताई मुळे, बाबू राठोड, ॲड धनंजय धरणे, सचिन भोई, अमृत पूदाले, सन्नी हजारे, सागर हजारे आदींसह बहूसंख्य कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. यावेळी मंदीरावर अकर्षक विदयूत रोषणाई करण्यात आली आहे. मंदीर परिसरात ही श्री राम जन्मोत्सवा निमीत्त् यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. दरम्यान श्री राम जन्मोत्सवा निमीत्ताने रामतीर्थ रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहनांची कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे भाविकांना जाण्या येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला.


 
Top