तेर /प्रतिनिधी 

धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा  प्राथमिक पदवीधर शिक्षिका   अर्शिया नजीर अहेमद शेख यांना  शैक्षणिक वर्ष 2021-22 सालचा तालुका आदर्श शिक्षिका पुरस्कार गट शिक्षण कार्यालय, पंचायत समिती धाराशिव यांच्या वतीने प्रदान करण्यात आला.                

 यावेळी धाराशिव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी  सय्यद असरार अहेमद  यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या यशाबद्दल जिल्हा परिषद उर्दू शाळा तेरचे मुख्याध्यापक  तय्यबअली शहा यांनी अभिनंदन केले.


 
Top