धाराशिव / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन गुरुवार दि.१६ मार्च २०२३ रोजी, नांदुरी, ता.तुळजापूर येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात नांदुरी व परिसरातील सर्व वयोगटातील ५०० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उदघाटन दादाराव वडणे (गुरुजी) व चंद्रकांत यादव तांबे (माजी सरपंच), यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती चित्तरंजन (अण्णा) सरडे (माजी पंचायत समिती सदस्य), विजय शिंगाडे (भजपा ओ.बी.सी.जिल्हाध्यक्ष), सौ.संगीता नागेश कोळी (सरपंच कुंभारी), संतोष क्षीरसागर (उप सरपंच), राजाभाऊ वडणे (कार्यकारी अभियंता महावितरण), अविनाश (दादा) इंगळे (शालेय समिती अध्यक्ष), पटेल सर (प्राध्यापक तेरणा अभियांत्रीकी महाविद्यालय), खंडु रोकडे (ग्राम पंचायत सदस्य), गोविंद दुलवणकर, फारुक पटेल (कार्यकर्ते भाजपा), कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचो सुत्रसंचालन विजय गायकवाड सर यांनी केले. यावेळी मुंबईचे डॉ.‍ अजित निळे, डॉ सचिन ढगे, डॉ. संदीप चौधरी, डॉ. श्रुती गामी, डॉ. श्वेता चिलगर, डॉ.सिध्दी वायकर यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हळ, अमिन सय्यद, पवन वाघमारे, मुकुंद कोरे, निशिकांत लोकरे, सचिन व्हटकर, रवी शिंदे, व उपकेंद्राचे कर्मचारी आशंता दत्तात्रय तांबे, आशा कार्यकर्त्यां यांनी परीश्रम घेतले.


 
Top