धाराशिव / प्रतिनिधी-

 धाराशिव जिल्ह्यातील आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न त्वरित तातडीने सोडविण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय व  समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्याकडे निवेदनाद्वारे  शिंगोली आश्रम शाळेतील शिक्षक सतीश कंुभार यांनी केली आहे.           

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,  धाराशिव जिल्ह्यातील आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मासिक वेतन दरमहा दहा तारखेपर्यंत व्होव,  शिक्षक कर्मचाऱ्यांची बारा वर्षाची वरिष्ठ वेतन श्रेणी व 21 वर्षाची निवड वेतन श्रेणी हा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असून धाराशिव जिल्ह्यातील आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी  पात्र असून सुद्धा त्यांना लाभ मिळालेला नाही आदीसह अन्य विविध प्रलंबित प्रश्न सोडवून तसेच या संदर्भात संबंधित आदेशीत करावे अशी मागणी  करण्यात आली आहे. निवेदनावार शिक्षक सतीश कुंभार यांची स्वाक्षरी आहे. 

 
Top