तुळजापूर / प्रतिनिधी-

गुढीपाडव्या निमित्ताने बुधवार दि.२२रोजी  श्रीतुळजाभवानी मंदीरातील  शिखरावर   देविचे महंत तुकोजीबुवा व त्यांचे शिष्य महंत वाकोजीबुवा यांच्या शुभहस्ते गुडी उभारुन त्याचे पुजन करुन आरती करण्यात आली.

यावेळी मंदीराचे धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे विश्वास कदम सेवेकरी छञे  सह पुजारीवृंद उपस्थितीत होते

 गुढी पाडवा (मराठी नविन वर्षा) निमित्त श्रीतुळजाभवानी मातेस   सुवर्ण अलंकार घालण्यात आले होते.

आज देविदर्शनार्थ तेलगंणा गाभाऱ्यात सुंदर व मनमोहक अशी फुलाची आरास करण्यात आली आहे.

 
Top