तेर / प्रतिनिधी 

धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ मधील विद्यार्थ्यांकडून शालेय परिसरातील झाडावर पक्षासाठी पाणपोईची उभारणी करण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

 सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने  नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत परिणामी वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडत आहे तर मग अशा कडाक्याच्या उन्हात पशु पक्षाचे पाण्याअभावी काय होत असेल याचा विचार न केलेलाच बरा मार्च महिना आला की पाण्याअभावी माणसाची जशी काहीली होते तसेच हाल पशु पक्षाचे होत असतील हीच जाणीव लक्षात घेत नेहमी समाज उपक्रमात सहभाग घेणाऱ्या तेर ता धाराशिव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ मधील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक गणपती यरकळ सहशिक्षक गोरोबा पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय परिसरातील झाडावर पक्षासाठी पाणपोईची उभारणी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी या उपक्रमासाठी क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , विशाल कदम , कृष्णा माने , करण देवकते , गायत्री सावतर , गौरवी गायके , समिक्षा मदने , पल्लवी माने , समृद्धी माने , अक्षरा अष्टेकर , किरण कानाडे , शिवकन्या कोकरे , जान्हवी लकडे , संस्कृती जाधव , दिव्या आगलावे आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top