तेर / प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील तेर येथील लोकवाट्यातून बांधण्यात आलेल्या कालेश्वर जटाशंकर मंदिरात कलश रोहन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
विविध धार्मिक कार्यक्रमाने गावातून कलश मिरवणूक काढून हिंगळजवाडी येथील दत्त मंदिराचे महंत ब्रह्मचारी किशन गिरी महाराज यांच्या शुभहस्ते कलश रोहन सोहळा संपन्न झाला. यावेळी ह .भ. प. गोविंदा महाराज पांगरकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करून कलश रोहन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी मंदिराचे मुख्य पुजारी सचिन महाराज खटिंग, बालाजी सुतार, बाळू भक्ते, इंद्रजित ढोबळे, बबलू काळे, तेरच्या माहेरवाशीण महिला ,भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.