परंडा / प्रतिनिधी - 

महाराष्ट्र शासन धाराशिव जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने 'संकल्प निरोगी महाराष्ट्राचा' या संकल्पनेतून तालुक्यातील भैरवनाथ साखर कारखाना स्थळी 'आशा' दिनाचे औचित्य साधून 'आरोग्य मित्र' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

    यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, माजी सभापती सतीश दैन, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ विश्वेश कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ कुलकर्णी, डॉ अबरार पठाण, आरोग्य मित्र मंडळाचे अध्यक्ष बालाजी नेटके आदी उपस्थित होते.  डॉ जितेंद्र डोलारे, रवींद्र अनभूले, बाळासाहेब निंबाळकर 

यांनी आरोग्य मित्रांना कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. गावागावांमधून बहुसंख्य रुग्ण पुढील उपचारासाठी आणि प्रगत सुविधा करिता मुंबई, पुणे, सोलापूर, या ठिकाणी जात असतात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विविध वैद्यकीय जनहिताच्या योजना राबविल्या जातात त्याचा सहज सुलभ लाभ जनतेला मिळावा राज्य शासनाकडून राबविण्यात येणारी महात्मा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम मोफत उपचार, धर्मदाय चारिटी व मुख्यमंत्री सहायता निधीतून  हृदयरोग प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, फुफूस प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, कर्करोग केमोथेरपी रेडिएशन, अशा एकूण २० गंभीर आजारासाठी उपरोक्त व्यक्तींना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी व या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते. याबाबत वेबसाईटचा कशा  पद्धतीने करावयाचा या बाबतची माहिती आरोग्य मित्रांना देण्यात आली. या दृष्टिकोनातून रविवारी आयोजित कार्यशाळेमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने तालुकास्तरावर १९९ आरोग्य मित्रांची निवड करण्यात आली. या सर्व आरोग्य मित्रांना वैद्यकीय सहायता निधी बाबतच्या कार्यपद्धतीची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. आशा दिनाच्या निमित्ताने सेवेत प्राविण्य मिळविलेल्या अशा सेविकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


 
Top