राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

धाराशिव / प्रतिनिधी-

 दमण आणि दिव बनावटी विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या कारचालकावर कारवाई करून कारसह चार लाख तीन हजारांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने इनगोंदा- वाटेफळ रोडवर केली.

विभागीय उपायुक्त पी. एच. पवार यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश व्ही. बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. एस. कोतवाल यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार 25 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद विभागातर्फे इनगोंदा ते वाटेफळ येथे सापळा रचून वाहनाचा पाठलाग करून कारवाई केली. या कारवाईत टाटा कंपनीची इंडिगो कार व विदेशी मद्याचे 20 बॉक्स जप्त केले. कारचालक शैलेश भाऊसाहेब हांगे (रा. सोनारी) यास ताब्यात घेतले आहे. कारवाई करणार्‍या पथकात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस. के. शेटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एम. पी. कंकाळ, जवान एल. ए. डोंबाळे, ए. एन. कोळी, व्ही. आय. चव्हाण यांचा समावेश होता.


 
Top