धाराशिव / प्रतिनिधी-

माहे सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये राज्यातील अनेक भागात सततच्या पावसामुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले होते. जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निकषाच्या पुढे जावून भरीव अनुदान वितरीत करण्यात आले होते, मात्र सप्टेंबर व ऑक्टोबर मधील अनुदान प्रलंबित आहे. सदरील अनुदान मार्च अखेर शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे   यांनी   सभागृहात सांगितले आहे, अशी मािहती   आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. 

 सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यातील १,९९,९०७ शेतकऱ्यांचे १,६३,६९८.४६ हे. क्षेत्राचे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीच्या अनुदानापोटी जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे रू.२२२.७३ कोटीची मागणी करण्यात आली होती. राज्यासाठी रु. ३२०० कोटी पेक्षा अधिकची रक्कम यासाठी लागणार असून मार्च अखेर पर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे मा. मुख्यमंत्री यांनी आज सभागृहाला आश्वस्थ केले.

 सदरील रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना वितरीत करावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सूरु होता. मार्च महिन्यातच हि मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.


 
Top