धाराशिव / प्रतिनिधी-

 परंडा तालुक्यातील अनाळा येथील रस्त्याचा लोकार्पण सोहळा व पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात  आले. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, शासनाकडून विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. डॉ.सांवत  पुढे म्हणाले की, अनाळा या गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि नागरिकांनी गावाच्या विकासासाठी स्वतः योगदान द्यावे. या गावाचा विकास अशा पद्धतीने करावा की, इतर जिल्ह्यातील  लोकांनाही आपल्या गावाचा आदर्श घ्यावा असे वाटावे. तसेच आता नव्याने उद्घाटन करण्यात आलेली विकास कामे ही  दर्जेदार व्हावे, यासाठी विशेष सूचना करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत आणि रस्त्याचे कामही उत्कृष्ट झालेले आहेत. हे टिकवणे आपली जबाबदारी आहे.

  येथील पशुधनाच्या आरोग्याची काळजी चांगल्या प्रकारे घेतली जावी, या हेतूने या दवाखान्याची निर्मिती  करण्यात आली आहे. असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.अनाळा ग्रामपंचायतीच्या वतीने एक कोटी रूपये खर्च करून विकसीत करण्यात आलेल्या  पशुवैधकीय दवाखाना, सिमेंट काँक्रीट रस्ता यासह विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते व विविध मान्य वरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद जि.प. चे माजी उपाध्यक्ष धनजंय सावंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता अण्णा साळुंके, जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. यतीन पुजारी, अनाळा नगरीच्या सरपंच अंबिका ज्योतीराम क्षिरसागर,  गौतम लटके, आण्णा जाधव, जोतीराम  क्षिरसागर , सभापती सतीष दैण, ग्रा.प. सदस्य दादा फराटे, अजित शिंदे, अर्चना कदम, स्वाती चव्हाण, सुनिता शिंदे, अनिता क्षिरसागर, बिभिषण शिंदे, भाऊसाहेब पाटील, निशिकांत क्षिरसागर, विनोद कदम, चांगदेव चव्हाण, आशोक शिंदे, रेवन्नाथ शिंदे, भारत जाधव,अंबादास क्षिरसागर, हरी शिंदे, साजिद शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


 
Top