धाराशिव / प्रतिनिधी-

भूम तालुक्यातील वालवड येथे जल जीवन मिशन अंतर्गत  पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन व शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रकल्प डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करावे, अशी सूचना मंत्री महोदयांनी यावेळी केली.

 7 कोटी  64 लाखा पेक्षा जास्त किंमतीच्या या कामांमध्ये आवक विहीर ,जोडनलिका, उपसा विहीर व पंपघर, जोड रस्ता, अशुद्ध पंपिंग मशिनरी,शुद्ध पाणी पंपिंग मशिनरी तसेच जलकुंभ आणि वितरण व्यवस्था आदी कामांचा समावेश आहे.

 यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अर्जुन नाडगौडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आदी उपस्थित होते.

 
Top